
अनंत विचार न्यूज दिनांक 13/11/2025
जनाधार मोठा! पंढरपूर निवडणुकीत अपक्षांची झुंबड
पंढरपूर (प्रतिनिधी) –
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या मुलाखतींमध्ये इच्छुकांनी आपले प्रबळ शक्ती प्रदर्शन करून “आम्हीच वरचढ आणि प्रमुख दावेदार” आहोत हे दाखवून दिले आहे. प्रत्येक प्रभागात चार-पाच दिग्गज इच्छुक असून, त्यांचा जनसंपर्क आणि लोकांमधील दांडगा प्रभाव लक्षवेधी ठरत आहे.

पंढरपूर नगरपालिकेत एकूण १८ प्रभाग आणि ३६ नगरसेवकांची रचना असून, या प्रत्येक प्रभागात इच्छुकांची स्पर्धा चुरशीची आहे. यामध्ये काही इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही, आणि त्यातून नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. असे नाराज इच्छुक जर अपक्ष म्हणून उभे राहिले, तर आगामी निवडणुकीचे समीकरण पूर्णतः बदलू शकते.

या संभाव्य अपक्षांमुळे शक्यता निर्माण होऊ शकतात:
1 )शक्ती प्रदर्शनानंतर माघार – अनेक इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवतील, मात्र ऐनवेळी काही कारणास्तव झाल्यास माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२)अपक्षांमुळे विजयी गणित बिघडण्याची शक्यता – काही ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी उमेदवाराचे गणित बिघडवून धक्कादायक निकाल लावू शकतात.
३)‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ – प्रमुख लढतीत पक्षीय उमेदवार एकमेकांत अडकले तर तिसरा अपक्ष उमेदवार विजय मिळवू शकतो.
४)अपक्षांची ही वाढती ताकद निवडणुकीचा निकाल अधिक रंजक आणि अनपेक्षित बनवणार इतके मात्र निश्चित
५) सत्ता स्थापनेत अपक्ष ठरणार निर्णायक – निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना अपक्षांचे महत्व वाढे
राजकीय निरीक्षकांच्या मते, या निवडणुकीत “पक्ष नव्हे, व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे” ठरणार आहे. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवार ही निवडणूक अधिक रंजक बनवतील.
काही इच्छुक म्हणतात — “तिकीट मिळो वा न मिळो, अपक्ष म्हणून लढू आणि जनतेची ताकद दाखवू.
