साप्ताहिक अनंत विचार न्यूज दिनांक 9/3/202
पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके यांच्या हस्ते येथील लोकमान्य विद्यालयात आधुनिक डिजिटल लॅबचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व अद्ययावत शिक्षण मिळावे या उद्देशाने ही डिजिटल लॅब सुरू करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके यांनी सांगितले की, आधुनिक काळात डिजिटल शिक्षणाची गरज वाढत असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञानार्जन करणे आवश्यक आहे. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा मिळणार असून त्यांच्या ज्ञानवृद्धीसह सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक २ मध्ये नगरोत्थान अभियान अंतर्गत डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे परिसरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक प्रसाद भैय्या कळसे, नगरसेविका प्रणिताताई किरण घाडगे, किरण घाडगे तसेच प्रभागातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
