अनंत विचार न्यूज दिनांक 23/4/2026
सोलापूर जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेली तसेच गेली ६५ वर्षे सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांचा व सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या सर्व सामन्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या दि.पंढरपूर मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲप व यु.पी.आय सेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीला दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.त्यानंतर बँकेच्या स्थापनेपासून आज वरच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या यशोगाथा या चित्रफितीचे सादरीकरण कण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी पंढरपूर मर्चंट बँकेने सुरु केलेल्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते होत आहे हि मोठ्या समाधानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी अनास्कर साहेब यांच्या संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी वाटचालीची माहिती दिली.तर मर्चंट बँकेच्या वाटचालीचा आढावा मांडत बँक प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक सोमनाथ डोंबे यांनी आपल्या मनोगतात पंढरपूर मर्चंटस् को-ओप बँक सभासदाच्या विश्वासावर भविष्यात पाचशे कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला.ज्येष्ठ संचालक नागेश काका भोसले यांनी सभासदाच्या विश्वासावर बँक अधिक वेगाने प्रगती पथावर वाटचाल करीत राहील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर यांनी पंढरपुर मर्चंट बँकेने सुरु केलेल्या या सेवेची प्रशंसा करीत जे इतर सहकारी बँकेस जमले नाही ते या बँकेने करून दाखविल्याचे सांगितले.बँकेने सुरु केलेली हि सेवा बँकेच्या ग्राहकांसाठी विशेषतः व्यापारी वर्गासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे संगितले.तसेच पुढील काळात मर्चंट बँकेस शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बँकेचे व्हॉईस चेअरमन विजयकुमार रामचंद्र परदेशी,व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.मंजुश्री सुधीर भोसले,नागेश आण्णासो भोसले,सोमनाथ सदाशिव डोंबे,राजेंद्र पवनलाल फडे,शितल विद्याधर तंबोली,विजयकुमार कांतिलाल कोठारी,भगीरथ औदुंबर म्हमाने,राहुल पांडुरंग शिंदे-नाईक,भारत शिवदास भिंगे,आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर,वसंत धोंडीबा शिखरे,संजय विठ्ठल जवंजाळ,सौ.सुनंदा पद्मकुमार गांधी,तज्ञ संचालक मारुती सुखदेव देशमुख,सुनील गंगाधर मोहिते यांच्यासह मॅनेजमेंट कमिटी सदस्य राजेंद्र सदाशिव मोरे,प्रमोद पांडुरंग मोहिते,शाम प्रभु गोगांव यांच्यासह बँकेचे सभासद,ठेवीदार,व्यापारी,हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन श्री विजयकुमार परदेशी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले
तर सदर कार्यक्रमास बँकेचे सभासद,ठेवीदार,व्यापारी,हितचिंतक यांनी बहुसंख्येने
उपस्थितीत होते.बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा,असे आवाहन व्यवस्थापक अतुल महादेव म्हमाने व उपव्यस्थापक रमेश नारायण कुलकर्णी यांच्यासह सर्व शाखाप्रमुख,कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
