अनंत विचार न्यूज दिनांक 5/11/2025
पंढरपूर : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपली नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील.
नामनिर्देशन अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर ठरविण्यात आली आहे. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.
मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणीची तारीख ३ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत आघाडी व सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून चुरशीची लढत अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहिता लागू
मतदान केंद्र, मतदान अधिकारी, मतमोजणी व्यवस्था, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण, निवडणूक वाद आणि तक्रारींचे निवारण
