
ANANT VICHAR NEWS, 18 march 2024 News, newspaper, page 4, marathi news,newspaper, anant vichar, नागरिकांसाठी मतदार मद, त कक्ष स्थापन 02186-299099 या क्रमांकावर मिळणार सुविधा, मतदार helpline no. नागरिकांसाठी मतदार मद, logo, election commission of India
अनंत विचार न्यूज दिनांक 18/3/2024
02186-299099 या क्रमांकावर मिळणार सुविधा नागरिकांनी हा नंबर सेव्ह करावा
पंढरपूर, दि:18- नागरिकांना निवडणूविषयक माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 42 सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघातर्गंत 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये सांस्कृतिक भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
सदर मतदार मदत कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02186-299099 असून हा मदत कक्ष चोवीस तास सुरु राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
सदर मतदार मदत कक्षातील हेल्पलाईन क्रमांकावर मतदार यादीतील नाव शोधणे, मतदार यादीतील अनुक्रमांक आदीबाबत आवश्यक असलेली माहिती तात्काळ देण्यात येणार असून, नागरिकांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी इथापे यांनी केले आहे.