
मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेट प्रुफ काचेचे आवरण बसविण्यात आले :- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, ANANT VICHAR NEWS, 18 march 2024 News, newspaper, marathi news,newspaper, anant vichar, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 18/3/2024
पंढरपूर (ता.17)- श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. त्यामध्ये श्रीं.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-याचे संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचे प्रस्तावित आहे. तथापि, गाभा-यातील संवर्धनाचे काम करताना मुर्तीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने श्रीच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबत 12 मार्च रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता.
मंदिरातील सर्व चांदी काम काढण्यासाठी 25 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या पर्यवेक्षणाखाली सर्व चांदी काढण्यात आली असून, मूर्तीच्या संरक्षणार्थ बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. आता, 18 मार्च पासून गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.