अनंत विचार न्यूज दिनांक 17/11/25
पंढरपूर – नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच नगरपालिकेच्या इमारतीत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभागनिहाय उमेदवार, त्यांच्या समर्थकांसह पक्षांचे कार्यकर्ते यांची सततची ये-जा सुरू असल्याने परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून मोठी उत्सुकता दिसून आली असून अनेकांनी शुभमुहूर्त साधत सकाळीच आपले नामनिर्देशन सादर केले. नगरपरिषद निवडणुकीतील स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आजच्या गर्दीतून स्पष्ट झाले. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहेत.
निवडणुकीची रंगत वाढत असताना नागरिकांचेही लक्ष या राजकीय घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
