अनंत विचार न्यूज दिनांक 26/09/2025
वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम
पंढरपूर- आद्य वीरशैव महिला मंडळाच्या वतीने नवरात्रीनिमित्त कुमकुम अर्चन चे महत्व असल्याने वशिष्ठ आश्रम रुक्मिणी मंदिर येथे गुरुवारी सामुदायिक कुमकुमअर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा कराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने रुक्मिणी मातेस साडी चोळी व 56 भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मंडळाच्या उपाध्यक्ष विशालक्षी पावले व संजीवनी ठिगळे यांनी नियोजन केले तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकारी नंदा भिंगे,सुनीता राहेरकर,मनीषा वासकर ,सुजाता माहीमकर,निर्मला भिंगे ,माधुरी भिंगे, कविता पावले ,अनुराधा स्वामी,आरती पावले, सुवर्णा स्वामी यांनी खूप परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सभासद व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
