अनंत विचार न्यूज दिनांक 27/09/2025

श्रीक्षेत्र पंढरपूर:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाच चौथ गायन पुष्प पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गुंफल.सुरुवातीला सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर गायक ज्ञानेश्वर मेश्राम,पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा,संजय कोकीळ यांचे शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून
झाली.सुरुवातीला वारकरी बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत रुप पाहता लोचणी,,विठू माऊली तू माऊली जगाची,कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी,संतरचना गात देवा तुझ्या नावाच र वेड लागलं,विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या अप्रतिम स्वरांनी रसिकांना अक्षरक्ष: वेड लावले.पंढरपूरकरांसाठी खास मेजवानीच ठरली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत निरुपण स्वामी राज भिसे तबला आदीनाथ कुटे हार्मोनियम तुषार केळकर पखवाज ओंकार घेगडे टाळ अनिल भुजबळ यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे सरांनी केले.
यावेळी पंढरपूर कला रसिकांनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.पुढे २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवास उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात आले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.
