अनंत विचार न्यूज दिनांक 20/08/2025
पंढरपूर,दि.१९/०८/२०२५- दि.१८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्री करण्यात येणार आहे.सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी,रा.अकबर अलीनगर यांचे घरी आहे .या मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखु असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून आली.सदर पोत्यांमध्ये ५०० ग्रॅम वजनाचे सिलबंद सुगंधित तंबाखुचे पुडे असल्याचे निदर्शनास आले. सदर पाकिटे फोडून पाहिला असता त्यास सुगंधित तंबाखुचा वास येत असल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५१०/२०२५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i) (ii) (iv), २७ (३) (९),३०(२) (a), ५९ भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७४, २७५,१२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळुन आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे
१) २,२३,०००/- रू किंमतीची तीन पांढऱ्या रंगाची पोती त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाची २२३ पाकीटे प्रत्येकी १०००/- रू किंमतीची असे एकुण २,२३,०००/-
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे पंढरपुर उपविभाग पंढरपुर,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निलेश रोंगे,पोना विनोद शिंदे,पोकॉ राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती,मसपोफौ /राजश्री कटके मपोकॉ/शोभा कदम यांनी केली आहे.
