: पंढरपूरचे नवीन तहसीलदार पदी सचिन लंगुटे यांची नियुक्ती, ANANT VICHAR NEWS, 3 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 3/2/2024
पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांची बदली .
पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची बदल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आणि तीन वर्षापूर्वी झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.पंढरपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांची बदली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ रत्नपुरी मळा वालचंदनगर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे बदली झाले आहे. तर त्यांच्या रिक्त पदावर सचिन लंगुटे म्हणून पंढरपूरचे नवीन तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे .
तसेच सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सहा अधिकारीच्या बदल्या झाल्या आहेत. पुनर्वसनचे अमोल कुंभार, पंढरपूरचे सुशील बेल्हेकर, महसुलचे दत्तात्रय मोहाळे, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, सामान्य प्रशासनाच्या गीता गायकवाड, यांची बदली करण्यात आली आहे.
