
अनंत विचार न्यूज दिनांक 29/06/2025
दि. 28 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत राहणार बंदी
पंढरपूर,:- आषाढी शुध्द एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी असून , यात्रा कालावधी 26 जून ते 10 जुलै 2025 असा आहे. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दि. 28 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.