
अनंत विचार न्यूज दिनांक 13/10/2023
श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर या संस्थेच्या सचिवा मार्गदर्शक आदरणीय मा. सौ सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मालादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयाची परिसर भेट अंतर्गत पंढरपूर शहरातील पोस्ट ऑफिस, बस स्टँड व शहर पोलीस स्टेशन या सरकारी कार्यालयांना भेटी यामध्ये प्रशालेचे चौथी व पाचवी चे विद्यार्थी सहभागी होते पंढरपूर शहर बस स्थानक येथे जाऊन पुढील माहिती घेतली.
*फलाट क्रमांक 1 ते 28 क्रमांक वर थांबणाऱ्या शहरी, ग्रामीण गाड्या. तसेच त्यातील असणारे गावांची नावे यांची माहिती घेतली.* *बस चौकशी केंद्र बस बुकिंग केंद्र येथे श्री लाड साहेब व ननवरे यांनी यांनी वेगवेगळ्या वयोगुटानुसार मिळणाऱ्या बसच्या सवलतीबाबत माहिती सांगितली.
त्यानंतर मुलांनी एसटी आधार केंद्रास भेट दिली आगार प्रमुख व श्री संदीप गोरे, गणेश पवार, राजेश अधटराव, विजय कांबळे, सौ.जोस्ना फुलारे या सर्व कर्मचाऱ्यांनी मुलांना खूप सुंदर माहिती सांगितली.
*9 ऑक्टोंबर जागतिक टपाल दिनानिमित्त पोस्ट ऑफिस यास भेट. उपपोस्ट मास्टर श्री विनोद धायगुडे व तोंडले साहेब यांनी मुलांचे स्वागत केले. प्रथम भागातील असणाऱ्या एक ते आठ खिडक्या बद्दल माहिती श्री गडदे व गायकवाड साहेब यांनी सांगितले. यानंतर पोस्टाच्या आतील भागात कागदपत्रे,साहित्य कसे वेगळे करतात व विभागवार कसे पाठवले जाते याची सविस्तर कौशल्यपूर्ण माहिती श्री तोंडलेसाहेब व सीनियर पोस्टमन श्री महामुनी यांनी दिली.
शेवटी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट दिलीअसता पंढरपूर निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सौ शिंदे मॅडम यांनी मुलांचे स्वागत केले.बालविवाह प्रीतिबंध,शहर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा,गुन्हेगारी नियंत्रण याबाबत व लहान मुलांनी व मुलींनी लैंगिक शोषण ( शरीरास अनोळखी स्पर्श ) या बाबत घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस हवालदार श्री आवटी, श्री कांबळे, श्री गोडसे व सह पोलीस फौजदार गोसावी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील निर्भया पथकाचे प्रमुख गजानन पाटील पोलीस दीदी अंबव्वा कोष्टी उपस्थित होत्या.
या सर्वजनिक परिसर भेटीचे नियोजन समिती प्रमुख श्री महेश भोसले सर व श्री आलनदीप टापरे व मार्गदर्शक प्र.मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर यांनी केले होते.*