
अनंत विचार न्यूज दिनांक 20/11/2023
गोपाळपूर येथील मंदिराबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत काही ही संबंध नसल्याचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रका द्वारे खुलासा केला आहे.
पंढरपूर दिनांक.19 /11/23 श्रीक्षेत्र गोपाळपूर येथील मंदिरात दर्शनासाठी पैसे घेऊन प्रवेश देण्याबाबत समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तथापि, महाराष्ट्र शासन स्थापित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या अख्यातरित पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य मंदिर, पंढरपूर शहर परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे आहेत. मात्र, गोपाळपूर येथील मंदिर अख्यातरित येत नाही.
यास्तव, गोपाळपूर येथील मंदिराबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा संबंध नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
अशा प्रकारचा खुलासा प्रसिद्धीपत्रका द्वारे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला आहे.