- अनंत विचार न्यूज दिनांक 21/11/2024
पंढरपूर विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, पंढरपूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज वाखरी (ता. पंढरपूर) या ठिकाणी देशी मद्याची अवैध वाहतूक करत असताना चारचाकी वाहनासह मद्यसाठा जप्त करून उमेश हिरालाल चव्हाण रा. भाळवणी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिली.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच 13 एफ के 6037 असून मुद्देमालाची एकूण किंमत 3 लाख 76 हजार 880 रुपये इतकी आहे. सदरची कारवाई , पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर याच्या निर्देशानुसार , राज्य उत्पादन शुल्क सोलापूर अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक एस .आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, बापू चव्हाण, स. दु. नि. गुरुदत्त भंडारे जवान विजय शेळके, प्रकाश सावंत, विनायक वाळूजकर व वाहचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.
संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक पंकज कुंभार हे करत आहेत.
अवैध मद्यविक्री अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे निरीक्षक पंकज कुंभार यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे