
अनंत विचार न्यूज दिनांक 1/2/2025
प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल समितीचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारशीने तसेच; सोलापूर (शहर) जिल्हा काँग्रेस सेवादल समितीचे अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांच्यावतीने कार्याध्यक्षपदी मोहसीन फुलारी यांची नियुक्ती करून त्यांच्या नियुक्तीचे पत्र सोलापुरातील काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आज रोजी देण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सचिव संजय हेमगड्डी, सेवादलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, शकील मौलवी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष जुबेर कुरेशी, सोशल मीडिया सेलचे शहर जिल्हाध्यक्ष तिरुपती परकीपडंला यांच्यासह अंबादास गुत्तीकोंडा, राजन कामत, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, नूरअहमद नालवर, हरुण शेख, शकूर शेख, अभिलाष अच्युगटला, दिपक मठ, हाजी मेहमूद शेख, जब्बार शेख, आदी पदाधिकारी तसेच; कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.