
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती गतिमान करण्यासाठी प्रत्येकाने 100 सैनिक बनवावे -एस के भंडारे, ANANT VICHAR NEWS, 20 march 2024 News, newspaper, marathi news,newspaper, anant vichar,डॉ बाबासाहेब आंबेडकरnews, photo, celebration
अनंत विचार न्यूज दिनांक 20/3/2024
मुंबई (दि.16,17 /3/2024) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली चवदार तळ्याच्या सत्यागृह वेळी निर्माण केलेल्या समता सैनिक दलाची शताब्दी आपण शिवाजी पार्क सारख्या मैदानावर भव्य स्वरूपात करायची असून तो पर्यंत 1लाख सैनिक तयार करावेत असे सांगून समता सैनिकानी आता आपली क्वालिटी दाखविणे गरजेचे असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व समता सैनिक दलाचे समूह राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी समता सैनिक दलाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक,
चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे दि 16,17/3/2024 रोजी केंद्रीय शिक्षक शिबीर व समता फोर्स कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. प्रथमत : डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिकखू
संघ प्रमुख भन्ते बी संघपाल महाथेरो,समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांनी आदर्शची पूजा केली.यावेळी प्रास्ताविक एस के भंडारे यांनी प्रास्ताविक केले त्यावेळी त्यांनी ,आता देशातील समता सैनिक दल संपूर्ण डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
चालू असूनदलाच्या सन 2027 च्या शताब्दी मध्ये एक लाख सैनिक बनविण्यासाठी प्रत्येक सैनिक, अधिकारी व दि बुद्धिस्ट सोसायटीच्या कार्यकर्त्याने 100 सैनिक बनविणे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान व आरक्षण विरोधक यांना मतदान होणार नाही ते सत्तेवर येणार नाही यासाठी काम करावे आणि संविधान बदलले तर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिस्ट सोसायटी, समता सैनिक दल यांनी जर गरज पडली तर रस्त्यावरची लढाई साठी तयार राहावे असे सांगितले.भन्ते बी संघपाल यांनी सैनिकांना त्रिसरण, पंचशील व आशीर्वाद दिला. या वेळी महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष भिकाजी कांबळे व मेजर जनरल प्रदीप कांबळे उपस्थित होते. दुपारच्या सत्रात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया व ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे उपस्थित होते.
केंद्रीय शिक्षक शिबिरात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कंपनी कमांडर व त्यावरील डिव्हिजन ऑफिसर, मेजर व भारतीय मिलिटरी सेवेतील माजी सैनिक व दलाचे वरिष्ठ पदाधिकारी असे 107 सैनिक व अधिकारी या शिबीत्रात सहभागी झाले होते.आणि समता फोर्स
च्या निवडीसाठी दि 17/3/2024 रोजी 40 वर्षा पर्यंतचे तब्बल 110 सैनिक /अधिकारी यांनी परीक्षा दिली त्यातून 80 जणांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया व शिक्षक शिबीर राष्ट्रीय उपाध्यक्ष / दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम व दादासाहेब भोसले, असिस्टंट लेफ्टनंट जनरल डी एम आचार्य व पी एस ढोबळे, मेजर जनरल उमेश बागुल व रमेश वाघमारे, मेजर राजाभाऊ आठवले, हेड क्वार्टर उपसचिव मोहन सावंत, मेजर रवींद्र इंगळे इत्यादीनी केले.