
अनंत विचार न्यूज दिनांक 11/12/23
पंढरपूर प्रतिनिधी /
सोलापूर पंढरपूर श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्या निमित्त हरिनाम सप्ताह चे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली.दिनांक 5 रोजी हरिनाम सप्ताह सुरू झाला होता. माना प्रमाणे सप्ताहाचे सात दिवस केसकर(कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.
दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडाभर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचे कडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगती चे आयोजन केले होते.आशी माहिती यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष दीपक रोंगे,बापूसो केसकर,विकास कुलकर्णी,उमेशराव परिचारक यांनी दिली.
पुण्यतिथी सोहळा मुख्य दिवस
दिनांक 11 डिसेंबर रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला पुण्यतिथी उत्सव म्हणजे भंडारा साजरा केला जातो. या दिवशी श्रींच्या समाधीवर दुपारी 12 वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.राज्याबरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.
या यात्रा कालावधी साठी ग्रामपंचायत खर्डी च्या वतीने सर्व तयारी स्वछता
पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग सज्ज असल्याची माहिती सरपंच मनीषा सव्वाशे यांनी दिली .यात्रा कालावधीत वाहन गावात येऊ न देता बाहेरून जाण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.याकरिता उपसरपंच शरद रोंगे व सर्व सदस्यांबरोबर ग्रामसेवक बी व्ही कुलकर्णी ,अण्णा कावरे ,लिपिक बंडूलाल पठाण ,प्रभू गायकवाड, आदी परिश्रम घेत आहेत.
तरी महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर तील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.