
अनंत विचार न्यूज दिनांक 21/10/2023
पंढरपूर :- श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ सुनीता ताई विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी माझा खजिना माझा संग्रह या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ मा. सौ.सुप्रियाताई पवार सो यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा. सौ. सुनेत्राताई पवारसो, मा. श्री सुनंजय (दादा) पवार सो,साळुंखे मामा प्र.मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर बहुसंख्य पालक उपस्थित होते.
मुलांनी ‘माझा खजिना व माझा संग्रह ‘ या उपक्रमात त्यांची खेळणी, शैक्षणिक साहित्य, अभ्यासक्रमातील तक्ते, नाणी,नोटा ठेवल्या होत्या. प्रत्येक गटप्रमुखांनी आपल्या गटाची खूप सुंदर अशी माहिती दिली. विविध देशांची चलने व त्यांची भारतीय चलनातील किंमत मुलांनी सांगितली. यामध्ये विविध गटांचे कागदकाम, मातीकाम यातील वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.*
*’ परिसरातील टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार केल्याने त्यातून उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य तयार झाले.’ असे प्रतिपादन मा. सौ.सुप्रियाताई यांनी केले.
‘प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देऊन परिसर भेटीतून मुलांच्या सर्वांगीण विकास साधला जातो. ‘असे प्रतिपादन मा.सौ. सुनेत्राताई पवार सो यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभव सतत वाढ होऊन विद्यार्थ्यांची प्रगती वाढत आहे. प्राथमिक शाळेचे कर्तव्य शाळा व्यवस्थित पार पाडत असल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले.
*गटप्रमुख चि. श्लोक पतंगे, चि.अर्णव शिंदे, कु.संचिता गाडगे व कु.आरोही खंकाळ यांनी आपल्या गटाची खूप छान माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजक वर्गशिक्षक श्री महेश भोसले सर यांनी सर्व पालकांचे आभार मानले.*