
व्याख्यानातून खरोखरच शिवरायांचे दर्शन घडून प्रेरणादायी अनंत विचार आमलात आणावे. , ANANT VICHAR NEWS, 16 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, celebration, shivjanmosav sohala, shri shivaji maharaj
अनंत विचार न्यूज दिनांक 16/2/24
प्रतिनिधी पंढरपूर /
पंढरपूर मध्ये अभिनव कार्यक्रमाची परंपरा साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे शिव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा पहिला दिवस शिवव्याख्याते श्री.गणेश शिंदे व प्रा.तुकाराम मस्के यांच्या स्फूर्तिदायी व्याख्यानाने संपन्न झाला. या कार्यक्रमास वैचारिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसादात लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे आणि अनंत विचारांचे दर्शन जीवनातील यश मिळविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. शिवरायांचे जीवन आणि अनंत विचार दर्शन घडवण्याचा हेतू या व्याख्यानमालेने पूर्ण होत आहे.
जयंतीचा जल्लोष झालाच पाहिजे, पण आपल्या जीवनात छत्रपतींचे गुण उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौऱ्याची गाथा आपल्याला माहीत असते. पण त्यांचे विचार, त्यांनी घेतलेले अभिनव निर्णय आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यांचा आभ्यास केल्यास आपल्या जीवनात त्यांचा उपयोग करून घेता येईल अशी संकल्पना श्री.अभिजीत पाटील यांनी मांडली आणि त्यातून हा कार्यक्रम साकार झाला.
पण यावेळी स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगेसर, किरणराज घाडगे, अमर पाटील, दिपक वाडदेकर, आनंद पाटील, तानाजी बागल, मध्यवर्ती शिवजयंती अध्यक्ष सतीश गांडुळे, गोरख ताड, रणजित बागल, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शंकर शिंदे, प्रवीण बाबा भोसले, स्वागत कदम, धनंजय मोरे, समाधान गाजरे, बंटी वाघ यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी तसेच विठ्ठल प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी उत्तम आयोजन केल्याबद्दल चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी कौतुक केले.