
अनंत विचार न्यूज दिनांक 6/8/2025
शिर्डी (प्रतिनिधी) – “साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. या नगरीचा महिमा संपूर्ण जगाला परिचित आहे. मुंबई नगरीत काम करत असलो तरी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती आयुष्याला कलाटणी देणारी असते. दरवर्षी आम्ही सर्व मंडळी बाबांच्या दर्शनासाठी येतो. येथे आल्यानंतर संसार आणि परमार्थ दोन्ही मिळतात,” अशा भावना मुंबईतील मिडिया क्षेत्रातील पत्रकार बांधवांनी व्यक्त केल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या या पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि दैनिक समर्थ गांवकरी अंक देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, दैनिक समर्थ गांवकरी चे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, तसेच शिर्डीतील अकोले तालुक्यातील भूमीपुत्र नामवंत उद्योजक भागवत भोर उपस्थित होते.
मुंबईतील उपस्थित मान्यवर पत्रकारांमध्ये संतोष झगडे, विजय घडाशी, कृपाल भट्टी, विनायक मुरुडकर, प्रणय कांबळे, मयूर कसबे, सचिन झगडे, शैलेन्द्र सावरदेकर, जयवंत पाटणकर आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात साईभक्ती, सामाजिक ऐक्य आणि पत्रकारितेतील बांधिलकीचा संदेश देण्यात आला.