
पंढरपूर प्रतिनिधी/शहीद मेजर कुणाल गोसावी यांची जयंती साजरी
भारत मातेचे थोर सुपुत्र शौर्य चक्र प्राप्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या 42 व्या जयंतीनिमित्त व माजी सैनिका यांचा सन्मान तसेच विशेष सन्मान म्हणून कार्यक्रम घेण्यात आला सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पंढरपूर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पंढरपूर शहर व साहित्य परिषद अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे सर ,वीर पिता मुन्नागीर गोसावी, वीर माता वृंदादेवी गोसावी व सर्व मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.कांतीलाल बटाने सुभेदार,हनुमंत खपाले नायब सुभेदार,व्यंकटेश बाबर नायब सुभेदार, श्रीविष्णू माळी नायब मोहम्मद अली बोरी नायक, दीपक क्षीरसागर लान्स नायक,
मुकुंद शिंदे हवालदार,बीएस इंगोले हवालदार,सदाशिव मोरे LRO,
शंकर बागल माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष,श्रीकृष्ण घाटोळे एस पी आर,पोपट कुलकर्णी हवालदार,ज्ञानेश्वर बागल,बाळू घळके,उत्तम कदम नाईक,पांडुरंग माने हवालदार ज्ञानेश्वर गोसावी सिग्नल प्रमुख तसेच
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एनसीसी कॅडीडेट मयुरेश गुजर व आदित्य वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष सन्मान मध्ये जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर पंढरपूर यांची साहित्य परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सन्मान विश्वजीत घोडके साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
घोडके साहेब यांनी मनोगता व्यक्त केले वीरपिता मुन्ना गिरी गोसावी व त्यांचे परिवार मुलांनी दिलेले बलिदान हे अजरामर आहे
आणि आज मला तुम्ही या कार्यक्रमास बोलवले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.कारण आज मला या सर्व माजी सैनिकांचा सन्मान की ज्यांनी देशाची सेवा करताना आपल्या प्राणाचा विचार न करता ते सेवा बजवत राहून पुरस्कार स्वीकारण्यास आलेले आहेत आणि या सर्वांचा सन्मान माझ्या हातून झाला हे मी माझे भाग्य समजतो.
सत्कारास उत्तर देताना आदरणीय श्री सिद्धार्थ ढवळे सर म्हणाले की गेली 50 ते 55 वर्ष गोसावी परिवारा बरोबर माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आज माझा सन्मान या कुटुंबीयांनी केला त्यांचा मी आभारी आहे
शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे जीवन त्यांचं कार्य त्यांचे बालपण आणि आणि शहीद झालेल्या दिवसापर्यंत चे प्रसंग श्री ढवळे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली
श्रीनाथ बालाजी गोसावी इयत्ता नववी कानापुरी सुंदर अशा मनोगतातून देश सेवा करताना व शहीद होणाऱ्या सैनिक मिल्ट्री मध्ये भरती होणारे सर्व जवान व त्यांना प्रोत्साहन देणारे माता पिता सर्वांचे कौतुक आपल्या मनोगतात केले
त्याने स्वरचित रचलेल्या शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या कवितेची प्रतिमा वीरमाता व वीर पिता यांच्याकडे सुपूर्त केली
श्रीनाथ गोसावी याचा सन्मान घोडके साहेब यांच्या हस्ते करण्यात आला
प्रास्ताविक वीरपिता मुन्ना गिरी गोसावी यांनी केले आणि आभार महेश म्हेत्रे सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास कुलकर्णी सर यांनी केले