
अनंत विचार न्यूज दिनांक 27/9/2024
पंढरपूर प्रतिनिधी/
पंढरपूर तालुक्यातील खेडेगाव तसेच वाड्यावस्त्यांवर चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे.अशी घटना घडली जुन्या कासेगाव रस्त्याच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत परिसरात ‘गुमास्ता सोसायटी’म्हणून आहे ज्या मध्ये जवळजवळ अडीचशे लोकांची वसाहत त्या ठिकाणी आहे.
परंतु या भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने पाणी,रस्ता,वीज या मूलभूत सुविधांच्या पासून हा भाग वंचित आहे.
अशा परिस्थितीत त्या ठिकाणचे नागरिक स्वतःचा जीव मुठीत घेऊन राहतात,
रस्त्यावरती कोणत्याही प्रकारची लाईट नसल्याने त्या भागातून जात येत असताना अतिशय धोकादायक भाग आहे,
त्यामुळे सध्या या भागामध्ये घरफोडीचे व वाटमारी सत्र चालू आहे.
अशीच घटना या भागामध्ये घडत असताना संदर्भात या वसाहतीतील लोकांनी विशेषता महिलांनी रात्री उशिरा डॉ. प्राजक्ता गोपाळराव बेणारे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण संपर्क करून त्यांनी सांगितले सध्या तीन घरफोड्या झालेल्या आहेत आणि आम्ही नागरिक महिला मुले भीतीने घराच्या गच्चीवर लपून बसलेलो आहोत. तरी तुम्ही आमची मदत करा
हे ऐकल्यानंतर डॉ बेणारे यांना दोन मिनिटं खूप भीती वाटली कारण या भागामध्ये महिला कामगार कामकाजी साठी महिला जास्त आहेत,
ज्या कामावर जाऊन उशिरा परत येतात.
त्यानंतर डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी तात्काळ
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी
यांना ताबडतोब व्हाट्सअप कॉल करून हा घटना प्रसंग सांगितला.
त्यांनी त्वरित डॉ बेणारे यांना प्रतिसाद देऊन तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला व तात्काळ त्यांना कार्यवाही करायचे आदेश दिले.
त्यानंतर पंढरपूर तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी त्वरित पोहोचले त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले संपूर्ण परिसर फिरून पिंजून काढला
त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणाऱ्या महिलांशी संवाद साधत त्यांना आधार दिला आणि तात्काळ त्यांनी महिलांना हे सांगितले की रात्रीतून दोन वेळा पोलीस प्रशासनाची गाडी या भागामध्ये पेट्रोलिंग करेल घाबरून जाऊ नये पोलीस प्रशासन नेहमीच आपल्या सोबत आहोत.
तरी सध्या पंढरपूर तालुक्यांमध्ये चोऱ्याचे व वाटमारीचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये गावातील सर्व विशेषतः महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावेळी नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की या भागातून रात्रीच्या वेळी जर नवरा बायको गाडीवरून येत जात असतील तर चोर झाडांमध्ये दबा धरून बसलेले असतात आणि नंतर गाडी थांबवून पुरुषाला मारहाण करून त्या महिलेचे सोन्याचे दागिने पैसे व मोबाईल काढून घेतात अशी माहिती यावेळी नागरिकांनी दिले. सदरच्या घटना घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षा द्यावी, संबंधित प्रशासन विभागाने रस्ते, लाईट, सोय सुविधा पुरवाव्यात हि अपेक्षा नागरिकाकडून करण्यात येत आहे.
या घटनेमध्ये सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर , अतुल कुलकर्णी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक , पंढरपूर तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, यांनी तत्परता दाखवली त्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.