
ANANT VICHAR NEWS, 2 may 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur News, marathi news, Newspaper, मतदान news, मतदान प्रक्रियाnews, photo, kamgar din special celebration, kamgar din special, kamgar din, mahavitaran, puraskyakar
अनंत विचार न्यूज दिनांक 2/5/2024
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील संभाजी देविदास रोकडे यांना बारामती येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण कंपनीकडून सन 2023-24 या काळातील कामगिरी चोख बजावली होती. त्यामुळे आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बारामती परीमंडल चे मुख्य अभियंता सुनील पावडे व उप औद्योगिक संबंध अधिकारी वायदंडे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन रोकडे यांना सन्मानित करण्यात आले.
सध्या संभाजी रोकडे हे पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे महावितरणच्या कार्यालयात प्रधान तंत्रज्ञ या पदावर कार्य करीत आहेत. त्यांनी गादेगाव मंडळची १०० टक्के वसुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यापूर्वी त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे.
तसेच विना अपघात सेवा सुरळीत वीजपुरवठा सेवा, विद्युत रोहित्राची काळजी अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे कामाच्या ठिकाणची देखभाल कर्तव्यदक्षता पाहून बारामती येथे कामगार दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर येथील अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता प्रकाश पाटील, शाखा अभियंता हरिदास मोरे, सहकारी प्रशांत लिंगडे, सारंग कोले यांनी रोकडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रोकडे यांचे परिसरातील वीज ग्राहक कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.