
अनंत विचार न्यूज दिनांक 9/12/2023
प्रतिधीनी-पंढरपूर/
धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती) आरक्षण प्रवर्गात समावेश करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे गुरुवार पासून अमरण बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्ते गणेश खरात,भिकाजी शिंगटे,राजाभाऊ धायगुडे यांनी या उपोषण आंदोलन सहभाग घेतला आहे.या बेमुदत अमरण उपोषणाच्या स्थळी भेट घेवून आंदोलनकर्ते यांची विचारपूस करून त्यांच्या उपोषणास शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी जाहीर पांठीबा दिला आहे.
महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळावे.मेंढपाळ्यांना होणाऱ्या मारहाणी बाबत कायदा करण्यात यावा.धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरांमध्ये अभ्यास केंद्र आणि राहण्यासाठी वस्तीगृह निर्माण करावे.
धनगर समाजासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी.मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यासाठी चराऊ कुरण उपलब्ध करून द्यावे.या प्रमुख मागण्यांसाठी सकल धनगर समाज बेमुदत उपोषणास शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील
यांच्यावतीने जाहीर पांठीबा दिला आहे.