
अनंत विचार न्यूज दिनांक 10/10/2024
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष देव माणूस रत्न टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. आख्ख्या भारतातील तमाम जनतेने मनापासून आणि हृदयातून ज्यांना भारतरत्न मानलं असे लाखो करोडोंचे पोशिंदें आणि अत्यंत दानशूर व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांच्या मिठा पासून ते कष्टकऱ्यांच्या ट्रक पर्यंतच्या उद्योगांचे साम्राज्य उभे करणारे आणि कामाईतील ६० ते ६५% रक्कम देशातील गरजूंना व त्यांच्या हितासाठी बाजूला काढणारा पृथ्वीवरचा खरा देवमाणूस, देशवासीयांसाठी कोहिनुर हिऱ्यापेक्षा सुद्धा मौल्यवान असणारे देशाचे अस्सल अनमोल रत्न भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष यांचे मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटांना साप्ताहिक अनंत विचार व परिवार तर्फे साश्रुनयनांनी भावपूर्ण पुष्प श्रद्धा सुमन श्रद्धांजली…!!