
प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न, ANANT VICHAR NEWS, 28 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, republic day celebration, republic day, pandharpur nagarparishad, group photo
अनंत विचार न्यूज दिनांक 26/1/2024
पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण 36 पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट, विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प, पालवी तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या पथकाने केलेल्या संचलनाचे
प्रांताधिकारी श्री. गुरव यांनी निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
शासकीय ध्वजारोहण समारंभास प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अपर तहसीलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नायब तहसीलदार पंडित कोळी, मनोज श्रोत्री, वैभव बुचके यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, पदाधिकारी, शासकीय अधिकारी- कर्मचारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा देण्यात आली. उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तसेच पोलीस दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी गुरव यांच्या हस्ते सहभागी पथकांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले.