
अनंत विचार न्यूज दिनांक 272/2025
प्रयागराज येथे महाकुंभाला महास्नानासाठी मकरसंक्रांतीपासून महाशिवरात्रिपर्यंत जाता आले नाही, याची खंत अनेक भाविक-भक्तांसह मान्यवरांच्या मनामध्ये असेल, यात शंका नाही. परंतु महाराष्ट्रात प्रयागराज एवढ्याच आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान दक्षिण प्रयागराज म्हणून ओळखले जाते. ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अकलूज टेंभुर्णी रोडवरील पृथ्वीच्या नाभीस्थानावर वसलेले नीरा_नरसिंहपूर हे होय. ज्याप्रमाणे प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे, त्याप्रमाणे नीरा नरसिंहपूर येथे त्रिवेणी संगम आहे यात शंका नाही. ज्याप्रमाणे प्रयागराज येथील कुंभ स्नानाचे महत्त्व अधोरेखित आहे, त्याचप्रमाणे दक्षिण प्रयाग म्हणून ओळखले जात असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथील त्रिवेणी संगमावरील स्नानाचे महत्त्व निश्चित स्वरूपात अधोरेखित झालेले आहे तसेच ते अनुभूतीजन्य आहे, यात शंका नाही. ऐनकेन प्रकारे कर्ज झाले असेल आणि ते फिटत नसेल तर निरा नरसिंहपुर येथील त्रिवेणी संगमावरील स्नानाला अधिकतम महत्त्व आहे.
स्नान करतेवेळी आपल्या उंची एवढा काळा धागा श्रीफळाला गुंडाळून तो त्रिवेणी संगमावरती अमावस्याला प्रवाहित केल्यास अथवा त्रिवेणीवर नदीपात्रात विसर्जित केल्यास आपल्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्यास व तशी मानसिकता प्रसन्न राहण्यास मदत होते, यात शंका नाही. हा प्रयोग करण्यास हरकत नाही.
ज्याप्रमाणे मकर संक्रातीला अडचण आली तर नंतर १५ दिवस संक्रांत साजरी केली जाते, त्याप्रमाणे महाकुंभावेळी प्रयागराज येथे जाण्यासाठी अडचण आली असेल तर येथुन पुढे गुरु बदलार्यंत निरा नरसिंहपुर येथील त्रिवेणी संगमावर कुंभस्नान केल्यास अनोखी अनुभूती येते.
माघ अमावास्या शके-१९४६ गुरुवार दि.२७-फेब्रुवारी-२०२५ पासुन वैशाख कृष्ण -२ शके -१९४७ बुधवार दि.१४-मे-२०२५ पर्यंत दक्षिण प्रयागराज श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे आपण महास्नान त्रिवेणी संगमावरती करू शकता! यात शंका नाही. कारण गुरु हा वृषभ राशीमध्ये १४ – मे-२०२५ पर्यंत विराजमान आहे.
शारदासुत श्री राधेश पोपट बादले पाटील, पंढरपूर