
अनंत विचार न्यूज दिनांक 25/4/2025
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना,मोबाईल बंदीची कडक अंमलबजावणी,
पंढरपूर दि.25 :- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणा-या प्रवेशद्वारावर सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा सदृश्य प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व कर्मचा-यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
कर्मचा-यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त व्हिआयपी गेटचा वापर करण्यात येत आहे.
मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी असून, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही यावेळी श्रोत्री यांनी सांगीतले.