
१५०० श्री सदस्यांनी पंढरपुरात स्वच्छता अभियान राबवून ३३ गाड्यांमधून केला २३ टन कचरा गोळा! स्वयंस्फूर्तीच्या स्वच्छता अभियानाने पंढरपूरकरांसह प्रशासनाला अनुभव आगळावेगळा!
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरामध्ये मनस्वच्छतेबरोबर शहर स्वच्छता करणाऱ्या १५०० श्री सदस्यांनी आज रविवारचे औचित्य साधून स्वच्छतेचा स्वयंसफुरतेने कार्यक्रम राबवला. या स्वच्छता अभियानामध्ये २३ टन कचरा गोळा झाल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा, ता. अलिबाग यांचे सौजन्याने पंढरपूर येथे स्वच्छता अभियान पंढरपूर येथे रविवार दि. २ मार्च २०२५, रोजी पद्मश्री मा. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहरात विविध ठिकाणी १५०० श्री सदस्यमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली. या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन लंगोटे, पोलिस उप अधिक्षक डॉ.अर्जुन भोसले , प्रशासनाधिकारी सुनील वाळुजकर, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, डॉ शरद वाघमारे , डॉ तोडकर , पंढरपूर शहरातील विविध असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी व पंढरपूर शहरातील व्यापारी कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, संत गाडगेबाबांचे राधेशजी बादले पाटील ,मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलीपे ,क्रेडाईचे अमित शिरगावकर , रनर्स असोसिएशनचे डॉ. मंदार सोनवणे, भारत विकास परिषदेचे मंदार लोहकरे,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली.
तसेच या कार्यक्रमाला संदीप मांडवे ,प्रशांत शिंदे, विजय वरपे यांचेसह मोठ्या प्रमाणात श्री सदस्य उपस्थित होते. याप्रमाणे पंढरपूर, सांगोला ,अकलूज ,मंगळवेढा, तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबिर ,निर्माल्य संकलन, (निर्मल्या पासून खत निर्मिती )वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन, जल पुनर्भरण आरोग्य शिबिर ,अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी सामाजिक उपक्रम राबवले जातात.आज तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील विविध १५ ठिकाणी १५०० श्री सदस्यांनी ३३ वाहनांमधून,व ३ काॅम्पॅक्टर च्या सहाय्याने २३ टन कचरा गोळा करुन जुना कासेगाव रोडवरील कचर डेपो येथे पाठवला असल्याची माहिती पंढरपूर नगरपालिकेने दिली आहे.