
ANANT VICHAR NEWS, 1 may 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur News, marathi news, Newspaper, मतदान news, मतदान प्रक्रियाnews, photo, newspaper
अनंत विचार न्यूज दिनांक 28/4/2024
फलटण प्रतिनिधी/
माळशिरस , नातेपुते , सदाशिवनगर पंचक्रोशीतील बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत खासदार रणजितसिंह नाईक
निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची
निवडणूक येत्या ७ मे रोजी होत
आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार
रणजितसिंह नाईक
निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
विजयासाठी नातेपुते , माळशिरस सदाशिवनगर पंचक्रोशीतील भाजपच्या निष्ठावतांनी सुरूवातीपासून
विजयासाठी कंबर
कसली आहे. तर आता बीआरएस चे विविध पदाधिकार्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य
तसेच खासदार रणजितसिंह नाईक
निंबाळकर यांनी केलेली विकासकामे पाहून देशात भाजपचेच
सरकार येणार पुन्हा एकदा नरेंद्र मोदी
च पंतप्रधान होणार आहेत. यामुळे brs तालुकाध्यक्ष अशोक भोसले व ओबीसी सेलचे अध्यक्ष शंकरराव बनकर यांनी आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला याबद्दल त्यांचे स्वागत फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा , नगरसेवक अजय माळवे , सुधीर अहिवळे , फलटण शहर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल श्रीवास्तव यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.