
- अनंत विचार न्यूज दिनांक 16/11/2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी पंढरपूर येथे प्रचारसभे निमित्त आले असता,उद्योग व व्यापार विभागचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली.
जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ पंढरपूरात जाहीर सभेसाठी आले होते. सभा संपताच पाटील यांनी भेट दिली आहे.
नागेश फाटे यांनी पाटील यांना यथोचित स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर नागेश फाटे यांच्या पक्षकार्य पद्धतीबाबत जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले.
या भेटीप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत,सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविकांत पाटील,पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण आसबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडवळ, उद्योजक रवी सावंत,डॉ.रमेश फाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी नागेश फाटे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला.
यावेळी नागेश फाटे यांना जयंत पाटील यांच्या गाडीचे सारथ्य करण्याचा सन्मान मिळाला.ही बाब त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याचे प्रतीक ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमच्या कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.पक्षाच्या विचारधारेसाठी काम करताना साहेबांकडून मिळणारे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन ही माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे.
साहेबांनी माझ्या निस्वार्थ कार्याची दखल घेतली आणि गौरवोद्गार काढले, यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी आली आहे, असे मत नागेश फाटे यांनी व्यक्त केले.