
anantvichar, anantvichar news portal, anantvichar news, news portal, news, marathi news, marathi, photo, pandharpur news, pandharpur, 10 july 2024, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा जाहीर निषेध
अनंत विचार न्यूज दिनांक 10/7/2024
पंढरपूर प्रतिनिधी/
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्यावतीने आज जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या आदेशाने आ.नितेश राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला .मा.मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे उद्योगपती श्री अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात इतर सेलिब्रिटींसोबत नाचले म्हणून आ.नितेश राणे यांनी बडबड करून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत .
तेजस ठाकरे यांच्यावर टिका करण्याचा काहीएक अधिकार नितेश राणेंना नसताना फक्त प्रसिद्धीच्या हेतूने त्यांनी अनुउद्गार काढले त्याचा पंढरपूर तालुका शिवसेने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आणि तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे ,उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे, नागेश रितूंड ,लंकेश बुराडे ,महादेव आयरे ,संजय पवार, हनुमंत हांडे, कल्याण कदम , तालुका उपयुवाधिकारी समाधान गोरे ,धनाजी भोसले आदी उपस्थित होते.