
महात्मा गांधी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा 2023 या हिंदी परीक्षेत यश, ANANT VICHAR NEWS, 1 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, group photo, hindi exam 2023, acheivement, competation, celebration
मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाचे 52 विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट
पंढरपूर प्रतिनिधी/
महात्मा गांधी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा 2023 या हिंदी परीक्षेत श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाची कु.भक्ती किशोर कवडे ही राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित प्रशालेतील एकूण 52 विद्यार्थी या परीक्षेत गोल्ड मिळेल मिळवून यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल यांचे व विषय शिक्षिकेचे परिसरातून कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विषय प्रमुख फरहाणा कादरी यांनी विशेष मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थापक सचिवा सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार. संस्थापक सल्लागार विजयसिंहजी पवार .यांचे शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक सचिवा सौ सुनेत्राताई पवार म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून परीक्षेची भीती न बाळगता बाह्य परीक्षांचा अभ्यास सुरू करावा. मिळालेले ज्ञान हे वाया जात नसून त्या ज्ञानाचा आपले जीवनात सतत उपयोग होत असतो.मुलांना सामूहिक संवादात्मक अभ्यासाचे आवाहन करून बौद्धिक कौशल्य वाढविण्यास सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि मेहनत या गोष्टी विकसित होण्यासाठी दररोज अभ्यास करणे व आपले मनोबल,व आत्मविश्वास वाढविण्यासाठी परीक्षा महत्त्वाच्या असून याशिवाय यश ,अपयश ,स्पर्धा या भावना कळणार नाहीत असे सांगितले.
कार्यक्रमासाठी जिल्हा युवक काँग्रेस आय अध्यक्ष सुनंजय पवार यांचे सह प्राचार्या नंदिनी गायकवाड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधुरी बोडके यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुमुदिनी सरदार, सविता लोखंडे, विभावरी डुबल यांनी विशेष परिश्रम घेतले.