
अनंत विचार न्यूज दिनांक 5/12/202
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या यावर्षीचा पुरस्कार कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही वाय पाटील यांना नुकताच बहाल करण्यात आला. व्ही वाय पाटील हे उत्तम शिक्षक व मुख्याध्यापक त्याचबरोबर विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रशालेत ओळखले जातात. नाविन्यपूर्ण प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय सातत्याने प्रशासनात ठेवून पालक,शिक्षक व शालेय प्रशासनात उत्तम गतिमानता कायम ठेवल्याने त्यांना हा पुरस्कार दिला गेल्याचे शिक्षक व पालक वर्गातून भावना व्यक्त होत आहेत.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र.पटवर्धन यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून मुख्याध्यापक व्ही वाय पाटील सर यांचा प्रशालेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याचे मत त्यांचा सत्कार करताना व्यक्त केले.यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नानामालक कवठेकर,सदस्य एस.पी. कुलकर्णी यांनीही आनंद व्यक्त करून आवर्जून उपस्थित होते.
प्रशालेचे उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक,शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे तर्फे श्री पाटील सर यांचे अभिनंदन केले.