
अनंत विचार न्यूज दिनांक : १६ / ११ / २०२३
कार्तिकी यात्रा २०२३
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाबाबत.
कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) गुरूवार, दि. २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी साजरी होत आहे. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
त्यानुसार, आज गुरूवार, दि. १६/११/२०२३ रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला असून श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार बंद होवून खालील राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत म्हणजे (दि.०१/१२/२०२३) रोजी पासून सुरू होतील याची सर्व भाविकभक्तांनी नोंद घ्यावी. दि. १६/११/२०२३ ते ०१/१२/२०२३ या कालावधीत खालील नित्योपचाराच्या वेळा वगळता २२.१५ तास पदस्पर्श दर्शन व २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे.
दररोज उपचार
———————————————-
(१). नित्यपूजा प.४ते५.
———————————————-
(२). महनैवेद्य. स.१०/४५ते११
———————————————-
(३) गंधक्षता. रा ८/३०ते ९.
———————————————
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख ( जळगांवकर महाराज), व सल्लागार समितीचे सदस्य अनिल अत्रे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.