
अनंत विचार न्यूज दिनांक 10/11/2024
पंढरपूर प्रतिनिधी / पंढरपूर शहरात आयोजित केलेल्या संपर्क आणि पदयात्रेला सरगम चौकापासून सुरुवात केली. सरगम चौकापासून सुरू झालेल्या या पदयात्रेमध्ये, कुंभार गल्ली, शिंदेनगर, कैकाडी महाराज मठ, दाळे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, तेले गल्ली, कर्नल भोसले चौक या मार्गी पुन्हा सरगम चौक असा प्रवास होता.
या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, आम आदमी पार्टीचे जील्हाध्यक्ष यम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना शरद जोशी पक्षाचे शिवाजी नागटिळक, यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रे मध्ये सहभागी होते.
स्थानिक नागरिकांशी विविध समस्या व व्यावसायिक अडचणींवर चर्चा केली. यामध्ये विविध क्षेत्रातले छोटे व्यापारी, ऑटोमोबाईल गॅरेज, पेंटिंग वर्कर्स, व्हील अलाइनमेंट दुकाने, पान टपरी, छोटे हॉटेल्स व्यवसायीक, अशा अनेक कर्मचारी या चर्चेमध्ये उत्स्फूर्त सामील झाली.
महागाई, जीएसटीमुळे पूर्वीसारखा व्यवसाय राहिला नसल्याच्या खंत व नाराजी या व्यापार वर्गांनी बोलून दाखवली.
विविध गल्लीमधून पदयात्रा जात असताना स्थानिक नागरिकांनी पायाभूत सुविधांचीही सोय नसल्याच्या तक्रारी केल्या. अनेक गल्लीमध्ये गटारी व विशेष करून सार्वजनिक मुतारीची व्यवस्था, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची सोय नसल्याचं नागरिक सांगत होते.
या विधानसभेमध्ये मला संधी द्या, पायाभूत सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, गटारी, प्रामुख्याने सार्वजनिक मोतारीची व्यवस्था व स्वच्छता या सगळ्या समस्या निश्चितपणे कायमच्या सोडवल्या जातील. असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी यावेळी दिला.