
पंढरपूरमध्ये अन्न औषध प्रशासन व शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेची कडक कारवाई लाखो रुपयांचा अवैद्य गुटख जप्त, ANANT VICHAR NEWS, 9 march 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 9/3/2024
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यु. एस. भुसे तसेच पंढरपूर शहर पोलिस स्टेशन सपोनी प्रकाश भुजबळ , श्रीकांत घुगरकर , नितीन जगताप , नागनाथ कदम ,पोलीस हवालदार गोडसे /398, पोलीस शिपाई मंडले/1216, पोलीस शिपाई माने/2190 यांच्या समवेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे खालील नमूद इसमांच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा गुटक्याचा विक्रीहेतु साठा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले.
जप्त साठ्याची किंमत
1. संजय पांडुरंग होनराव यांचे मे. राजलक्ष्मी जनरल स्टोअर्स दुकानातून खालील साठा ताब्यात घेतल्याचे सांगितले.
72515/- रुपये किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाला
2. अजिज अब्दुल तांबोळी भोसले चौक, पंढरपूर यांच्याकडील खालील प्रमाणे साठा ताब्यात घेतल
50,1320/- रुपये किमतीचा विमल व इतर कंपनीचा सुगंधी तंबाखू पान मसाला
3. सागर उत्तम अभंगराव, जुनी पेठ, कोळे गाली, पंढरपूर यांचेकडील खालील प्रमाणे साठा ताब्यात घेण्यात आले
2600/- रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला मावा
उपरोक्त तिन्ही ठिकाणातून प्रतिबंधित सुगंधी पान मसाला एकूण किमत रुपये 576435/- चा साठा जप्त करण्यात आल
दिनांक 07/03/2024 रोजी वर नमूद ३ इसमांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्रीहेतू साठा करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई, यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसूचना-496/7,
दिनांक 18 जुलै जुलै 2023 नुसार जारी केलेल्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, मावा इत्यादी तत्सम अन्न पदार्थाचा विक्रीहेतू महाराष्ट्र राज्यामधून उत्पादन, वाहतुक, साठा, विक्री बंदी आदेशाचे भंग केलेले आहे, तसेच गुटखा, पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचे विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (1) व 26(2)(ii), 26(2)(iv), सहवाचन कलम 27 (3) (E), कलम 30 (2) (A) व शिक्षापात्र कलम 59 नुसार भा. द. वि.स कलम 188, 272, 273 व 328 प्रमाणे त्यांचे विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच
उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.