
- अनंत विचार न्यूज दिनांक 21/12/2024
21 डिसेंबर रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस निसर्गोपचार केंद्र त्याचबरोबर हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिटेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरमध्ये सकाळी साडेसहा वाजता पार पडला . यानिमित्ताने ध्यानाचे महत्त्व आणि त्यामुळे जीवनामध्ये होणारा अमुलाग्र बदल त्याचबरोबर आपल्या भारतीय प्राचीन ऋषीमुनींनी संपूर्ण विश्वाला दिलेला एक अनमोल ठेवा म्हणजे ध्यान होय. ध्यानाच्या माध्यमातून आपण शारीरिक आणि मानसिक अध्यात्मिक विकास चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपल्या परिसरात प्राणाहुती संप्रेषित हृदयावरती ध्यान करण्याचे मार्गदर्शन आज या ठिकाणी पार पडले . या निमित्ताने ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या सर्वेसर्वा डॉ. ज्योती शेटे यांनी या ध्यान योगाचे आयोजन केलं होतं यावेळी मोहिते हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये या ध्यान शिबिराचा ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या योग साधिकांनी याचा लाभ घेतला.