
- अनंत विचार न्यूज दिनांक 23/10/2024
पंढरपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला यावेळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना (इंटक), अखिल भारतीय सफाई मजदुर संघटना, कास्ट्राइब संघटना चे पदाधिकारी अँड.सुनील वाळूजकर ,महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे नागनाथ तोडकर,संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, किशोर खिलारे, राम सर्वगोड, बाली मंडेपू, गुरु दोडिया यांच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या समवेत चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या मान्य करण्यात आल्या. पंढरपूर नगर परिषद मधील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी ॲडव्हान्स रुपये रू .१२५००/-देण्यात येतील, सेवा निवृत्त झालेल्या १/१/२०२३ ते ३१/३/२०२४ पर्यंतच्या ६० कर्मचाऱ्यांना रजा वेतन व उपदानाची रक्कम देणेत येईल, जानेवारी २०२४ ते जून २०२४ सहा महिन्याचा ४% महागाई भत्ता याचा फरक देणेत येईल, सातव्या वेतनामधील राहिलेला चौथा व पाचवा हप्ता देण्यात येईल,तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे कॅशलेस विमा उतरणेत येईल, तसेच शासनाने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार करावेत म्हणून परिपत्रक काढलेस ऑक्टोबर ०२४ पेड नोव्हेंबर ०२४ चा चा पगार करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार १०/२०/३० ची कालबद्ध पदोन्नती देण्यात येईल, मुकदमाची रिक्त पदे भरण्यात येतील या चर्चेच्या वेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी संतोष सर्वगोड,धनजी वाघमारे,दत्ता चंदनशिवे,दिनेश साठे,जयंत पवार, महावीर कांबळे, दशरथ यादव, संदेश कांबळे, महेश गोयल,संजू वायदंडे,सतीश सोलंकी, वैभव दंदाडे, लक्ष्मीकांत सोनवणे,अनिल गोयल उपस्थित होते लेखापाल करुणा शेळके , रोखपाल गणेश धारूरकर, प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी, कार्यालय अधीक्षक सुवर्णा हाके यावेळीं उपस्थित होते.सर्व मागण्या मान्य झाल्याने संघटने वतीने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांचा सत्कार ज्येष्ठ कामगार नेते नानासाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात येऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले