
अनंत विचार न्यूज दिनांक 25/5/2025
पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने किमान समान शिबीरांतर्गत वाखरी ग्रामपंचायत येथे पंढरपूर तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहदिवाणी न्यायाधीश एन. एस.बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात न्यायाधीश एन.एस.बुद्रुक यांनी उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक जनजागृती करुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.ॲड. देशमुख यांनी उपस्थित गावक-यांना तंबाखू विरोधी दिनांबाबत मार्गदर्शन केले.ॲड. चौगुले यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळाबाबतच्या कायद्या विषयी मार्गदर्शन केले.
प्रारंभी कायदेविषयक शिबीराची प्रस्ताविका पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आर. बी.चौगुले यांनी केली.सुत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव ॲड.ए.एम.देशमुख यांनी केले.
या शिबीरास विधी स्वंयसेवक सुनील यारगट्टीकर आणि न्यायालयीन कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहदिवाणी न्यायाधीश एन. एस.बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली कायदे विषयक शिबीर संपन्न