
अनंत विचार न्यूज दिनांक 9/11/2024
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांच्या गावभेट दौऱ्यास गावातील सर्वसामान्य नागरिक, युवक युवती, महिला शेतकरी वर्ग, व्यापारी व कै.भारत नाना भालके यांना स्वाभिमानी विचारांची जनता यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येते आहे. अनेक गावात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी भगिरथ भालके आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, मतदार संघातील स्वाभिमानी जनता योग्य व स्वाभिमानी उमेदवारालाच आशिर्वाद देऊन विजयी करतील.मी सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार असुन विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते असुन मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.
लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचा असला तरी सरकारला जाब विचारणार असला पाहिजे. पिक विमा, वीज, अवकाळीने नुकसान झाल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत गेले पाहिजे होते मात्र लोकप्रतिनिधी या प्रश्नांवर गप्प राहिले. त्यामुळे आता बदल घडवणे आवश्यक आहे, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी ब्रह्मपुरी ता.मंगळवेढा येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
या दौऱ्यात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, समाधान फाटे, ॲड.राहुल गुले, मारुती वाकडे,पांडुरंग चौगुले,ॲड.अर्जुन पाटील, भारत बेदरे,दयानंद सोनगे,ॲड.रविकिरण कोळेकर, मनोज माळी, अभिमन्यू बेदरे, सिद्धेश्वर धसाडे, सत्तार इनामदार, महादेव फराटे, संतोष सोनगे, नितीन पाटील, गुलाब थोरबोले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना भगीरथ भालके म्हणाले, दामाजी कारखान्यात चुकीचे काम करणारा माणूस बदलण्यासाठी समविचारी आघाडी स्थापन करण्यात आली. आता तोच माणूस बदलण्यासाठी मी लढतोय. तुम्ही माझ्या सोबत या.
महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत भालके यांना बोराळे ता.मंगळवेढा येथील ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकी करिता 9,999 रुपये देणगी म्हणून देण्यात आले.
गावभेट प्रचार दौरा दरम्यान मुंढेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, अरळी, नंदुर, डोणज, बोराळे या गावामध्ये जनतेसमोर भगिरथ भालके यांनी आपली व कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.