
अनंत विचार न्यूज दिनांक 4/12/2023
प्रतिनिधी पंढरपूर /
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीस गढ या राज्यात भाजप ने यश संपादन केले.
यानिमित्त पंढरपूर शहरात शहर भा ज पा ने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजयी जल्लोष केला. पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट
भा ज प महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे,
भा ज पा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, अपर्णा तारके, अक्षय वाडकर, गिरीश आराध्ये,
धीरज म्हमाने, विश्वास कारंडे, अशोक डोळ, नितीन शहा, विश्व हिंदु परिषदेचे रवींद्र साळे, दिनेश माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिठाई वाटप करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाला पाठींबा दिला असल्याचा दावा यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली.