
अनंत विचार न्यूज दिनांक 3/12/2023
प्रतिनिधी पंढरपूर/
सध्या पंढरीत चर्चेचा विषय ठरलेला पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांनी सर्वे करून २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक काळासाठी १०% वाढीव कर वाढीची नोटीस नागरीकांना दिल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत असताना काल नगर परिषद येथे हरकती नोंदविण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती.
या अनुषंगाने महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी चे संस्थापक अध्यक्ष संतोष माने यांनी आज पंढरपूर नगर परिषद येथे मुख्याधिकारी डाॅ.प्रशांत जाधव यांची समक्ष भेट घेवून करवाढ विरोधातील लिखित निवेदन सुपूर्द केले.त्यावेळी शहर अध्यक्ष गौरव वाडेकर,भा,ज,पा अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य किशोर सिताराम जाधव, कार्यकर्ते प्रेम पाठक,ॠशी वाडेकर व हरकतदार नागरीक उपस्थित होते.
सदर निवेदनात २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक काळासाठी सदोष मुल्यमापन अंदाधुंद सर्वेक्षण करून केलेली १०%करवाढ मागे घ्यावी अन्यथा पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने करवाढीचा निषेध म्हणून साखळी आंदोलन (उपोषण)करण्यात येईल असेही सुचित करण्यात आले आहे. मुख्याधिकारी जाधव यांनी लिखित निवेदनावर चर्चा करून आपण सुचविलेल्या सुचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू असे आश्वासन दिले.
२०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर काॅरीडाॅरचा धसका घेतलेल्या शहरवासियांना १०% करवाढीची नोटीस आल्याने मोठा धक्का बसला आहे.त्यात प्रबळ सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पाठ फिरविल्याने महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी शहरवासीयांच्या पाठिशी उभी राहिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.