
अनंत विचार न्यूज दिनांक 27/07/2025
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपट्टे रा.महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपुर ता. पंढरपुर जि.सोलापुर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करून अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवुन वाळुचे कारणावरून जिवघेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व शहरा लगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती जी की,भारतीय न्याय संहिता २०२३ मधीत प्रकरण ६ व १७ मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होती.एक धोकादायक व्यक्ती व वाळु तस्कर म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते त्याचे विरुध्द अनेकवेळा गंभीर स्वरूपाचे शरीराविषयीचे तसेच खुनाचा प्रयत्न करणे व अवैध वाळु व्यवसायाबद्दल गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळवुन त्याने पुन्हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे तसेच अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच ठेवले होते.तो कायद्याला जुमानत नव्हता म्हणुन सराईत धोकादायक व्यक्ती वाळु तस्कर गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपट्टे याचे विरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती,वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा सन १९८१ मधील कलम ३ (१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापुर यांना पाठविणेत आला होता.त्याअनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी.डी.ए कायद्यांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केल्याने स्थानबध्द इसमास ताब्यात घेवून येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करणेत आलेले असून पंढरपुर शहरातील आणखीन अशा प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभुमी असणार्या गुन्हेगारांवरही कारवाई करण्याची प्रक्रिया चालु करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपूर विभाग,पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे,स.पो.फौ.कल्याण ढवणे,पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच श्रे. पो.सई.राजेश गोसावी, पो.हवा.शिवाजी पाटील,सिरमा गोडसे,प्रसाद औटी,सचिन हेंबाडे,विठ्ठल विभुते, पो.कॉं.कपिल माने, शहाजी मंडले,बजरंग बिचकुले,धनाजी मुटकुळे,दिपक नवले,अनिस शेख तसेच रतन जाधव यांनी केली आहे.