
अनंत विचार न्यूज दिनांक 6/3/2025
भैरवनाथ वाडी येथील वामनराव माने प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक दत्तात्रय म्हस्के यांनी शिक्षण शास्त्र विषयातील पीएचडी प्राप्त केली आहे
त्यांना पीएचडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी प्रदान केली असून त्यांच्या संशोधनाचा विषय “सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक स्तरावरील भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक कार्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास ” असा होता त्यांनी प्राचार्य डॉक्टर व्ही डी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संशोधनकार्य पूर्ण केले नेताजी शिक्षण प्रसारक मंडळ ईश्वर वठार या संस्थेचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने ,राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने, संचालक डॉक्टर प्रताप सिंह माने ,विजयसिंह माने, मातोश्री गुरुकुल चे प्रमुख विक्रमसिंह माने ,अजय सिंह माने, प्राचार्य उत्तमराव कोकरे ,अशोकानंद राक्षे चंद्रकांत पिटले सर यांनी अभिनंदन केले आहे