
अनंत विचार न्यूज दिनांक 8/2/2025
पंढरपूर प्रतिनिधी/
पंढरपुरात माघी यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विठू माऊलीच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमली आहे. माघी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या दर्शनाकरिता 4लाख भावीक भक्त पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले असल्याचा अंदाज आहे. मात्र विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नगर प्रदक्षिणा करीत असताना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये अनेक वाहनधारकांनी रस्त्यावरच आपली वाहने पार्क केल्यामुळे अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. विशेषता मठाच्या ठिकाणी पंढरपुराती वाहने रस्त्यावरच वाहने लावल्याने येणाऱ्या दिंड्यांना आणि भाविकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नगर प्रदक्षिणा करावी लागत आहे.
पंढरपूर येथे माघी यात्रेकरिता आणि विठू माऊलीच्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांनी अरुंद रस्त्यातून मार्ग काढत नगर प्रदक्षिणा करावी लागत आहेत वाहनधारकांना वाहने पार्क करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्यामुळे व मोठ्या वाहनांना शहरात थेट प्रवेशनामुळे वाहनधारकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली आहे. त्याचबरोबर सदर परिसरात आजूबाजूला मठ परिसर असल्यामुळे मठातून बाहेर पडणाऱ्या भाविकांना गर्दीतून वाट काढत नगर प्रदक्षिणा करावी लागत आहे.गेल्या काही दिवसापूर्वीच प्रशासन यात्रेकरिता सज्ज असल्याचे सांगण्यात आले होते मात्र. पंढरपुरात वाहतुकीचे नियोजन फिस्कटले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास दिसून येत आहे.वास्तविक पाहता पंढरपूरला भाविकांसाठी नगर प्रदक्षिणा अत्यंत महत्त्वाची असते. ग्रामीण भागातून तसेच आसपासच्या शहरातून दिंड्या पालख्या पंढरीत पायी चालत येत असतात. शहरातील याच भागातून भाविक मोठ्या संख्येने चंद्रभागा नदीकडे पायी जात असतात. चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून भाविक भक्त विठू माऊलीच्या दर्शनाकरिता जात असतात. पायी येणाऱ्या भाविकांना नगर प्रदक्षिणा घेत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारचे नियोजन केले जात असते विविध उपायोजना राबवल्या जात असतात मात्र यंदा माघी यात्रेच्या काळामध्ये पंढरपुर शहरात नगर प्रदक्षिणा मार्गावर थेट वाहनेच प्रवेश करत असल्यामुळे भाविकांना अडचणीचा सामना करत नगर प्रदक्षिणा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रशासनाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे.गेल्या काही दिवसांमध्येच प्रशासन माघी यात्रेकरिता सज्ज असल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रशासनाने यात्रा कालावधी विविध नियोजन केले असल्याचे सांगितले होते . भाविकांची यात्रा सुरक्षित रित्या पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज आहे अशा प्रकारचे वार्तालाप केले होते मात्र वास्तविक पाहता व प्रशासनाला पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन सुद्धा करता आले नाही. हे यातून दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे हे नियोजन केवळ मीटिंगमध्ये वकागदावरच उरले असल्याचे भाविकांतून बोलले जात आहे. या बाबत भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर बस स्थानक बंद ठेवल्यामुळे नवीन चंद्रभागा बस स्थानकावर पुर्ण यंत्रणा नेसल्याने दर्शक फलक,रस्ता, एसटीचे जाण्याचा मार्ग येण्याचा मार्ग फलक, आशा एक ना अनेक प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या भाविक भक्तांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी येणाऱ्या भाविक भक्तात प्रदक्षिणा मार्गावर वाहतूक कोंडी, रस्ते स्वच्छ व धूळ मुक्त, ठिकठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, अशा सोय सुविधा भाविक भक्तांना मिळावे एवढीच अपेक्षा श्री विठ्ठलाच्या भक्तांकडून जात आहे.