
- अनंत विचार न्यूज दिनांक 17/12/2024
छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षी श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान, लाडगाव च्या माध्यमातून परमपूज्य स्वामी सागरानंद सरस्वती, कुंभमेळा मा.अध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक धार्मिक कार्यातील सर्वोच्च कामगिरी करणार्या समाज सेवकाचा धर्मभुषण पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येतो, या वर्षीचा धर्मभुषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कट्टर नरहरीभक्त काकासाहेब सुमनबाबुराव बुराडे यांना जाहीर करण्यात आला.
त्याच पुरस्कार वितरण समारंभा च्या कार्यक्रमात बोलताना अध्यात्मात अंधश्रध्दा नसते, असे प्रतिपादन धर्माचार्य १००८ महामंडळेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी दत्त दिगंबर पीठ, श्री क्षेत्र लाडगाव येथे केले. ते म्हणाले, १०८ महतांच्या माध्यमातून कार्याला गती द्यायची आहे, आतापर्यंत दहा महंतांना दीक्षा देण्यात आली आहे, धर्माची व्याख्या निश्चित नाही…! त्या व्याख्येलाही मर्यादा आहे…. परंतु स्त्री- पुरुष समानता व माणुसकी धर्म हा हाच खरा धर्म होय. यात कुठल्याच भेदभावाला थारा नसावा. अंधश्रध्दाही नसावी.
दरवर्षी प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे अन्नदान, भजन, नामस्मरण व धर्मभुषण व नारीशक्ती पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या भक्तीमय व आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात
भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नरहरीभक्त राजेशकाका बुराडे यांना धर्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना न्यायमुर्ती अँड.गोंधळेकर मॅडम म्हणाल्या समााजिक कार्यातून माणसाला तळागाळापर्यंत पोहचता येते. या वेळी ॲड. अर्चना गोंधळेकर, प्रा. डॉ. मोहन देशमुख, बदाम तौर पाटील, १०८ महंत वीर भगीरथेश्वर बाबा, सोलगव्हाण, गुजरातचे हिरगिरी बापू, रामेश्वर महाराज, बाबूराव खंडागळे महाराज, गांगुर्डे महाराज, सुरेश टाक, श्री संत नरहरीमहाराज सोनार पुतळा व स्मारक समिती प्रदेशाध्यक्षा सारीकाताई नागरे, कमलाकर दहिवाल, सराफ फेडरेशनचे सोपानराव मुंडलिक, अशोकमामा मैड, ग्रामीण सोनार संघटनेचे मधुकरराव मैड, मधुकरराव टाक, सरपंच गजानन बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल दहिवाळ, मयुर वंजारी, परमेश्वर माताडे, ञानेश्वर तांबे, बळीराम बागल, चंद्रकांत धाडगे, अरूण अबनावे, शंकरराव डहाळे, पूजा उदावंत, प्रयाग तांबे, गयाबाई बागल* आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
शांती मंत्रोच्चारात व पुष्प वृष्टी करीत टाळ्यांच्या गजरात संत महंतांच्या उपस्थित नरहरीभक्त राजेशकाका बुराडे यांना धर्मभुषण पुरस्कार वितरीत करण्यात आला, यावेळी बोलताना धर्मभुषण राजेशकाका बुराडे म्हणालें की, हा पुरस्कार म्हणजे भारतीय नरहरी सेनेच्या कार्याची पोहोच आसून या पुरस्काराने माझ्या सह भारतीय नरहरी सेनेच्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. या पुरस्काराला साजेस कार्य मी व माझे सर्वच सहकारी भारतीय नरहरी सेनेच्या माध्यमांतून करत आहोत व करणार असल्याची ग्वाही पुरस्कार स्वीकारल्यानंतर काकासाहेबांनी दिली.
या वेळी संत महंत समाज बांधव मोठ्या संख्येन उपस्थित होते.