
- अनंत विचार न्यूज दिनांक 13/12/2024
पंढरपूर येथे तालुका युवक काँग्रेस यांच्यावतीने शहर आणि, तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य पुरेशा प्रमाणात तथा वेळेवर मिळावे तसेच; त्यांची रेशन कार्डे (शिधापत्रिका) ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात यावीत यासंदर्भात तहसीलदारांना एक रीतसर निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, पांडुरंग डांगे, जिल्हा सरचिटणीस एकनाथ माने, शहर सचिव सोमनाथ आरे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष गणेश माने, सोशल मीडिया विभागाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश आधटराव, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र अग्रवाल, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, आनंद सोळाशे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहिले होते.