
अनंत विचार न्यूज दिनांक 15/9/2024
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन
मुंबई, दि.१५ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजन केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.